गोहत्या केल्यास होणार जन्मठेप, गुजरात सरकारचे कठोर धोरण

5

सामना ऑनलाईन । गांधीनगर

गुजरात सरकारने गोहत्येबाबत कठोर धोरण अवलंबले असून गोहत्या करणाऱ्या व्यक्तीला आता जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. याशिवाय, एक लाख रुपये इतका दंडही भरावा लागू शकतो. गुजरात विधानसभेत गोरक्षणासाठी आज महत्त्वपूर्ण कायदा संमत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी गायींच्या रक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार या नवीन कायद्याची अंमलबजावणी अत्यंत सक्तीने केली जाणार आहे.

गेल्या वर्षी गुजरातमधील ऊना शहरात गोहत्या केल्याच्या संशयावरून दलितांना मारहाण केल्याचं प्रकरण घडलं होतं. या घटनेचा देशभरातून निषेध झाला होता. तसंच, या विरोधात आंदोलनंही करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या