Rohit Sharma ‘हिटमॅन’ परीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा कशी गोड हसतेय

29


सामना ऑनलाईन । मुंबई

‘हिटमॅन’ रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून छोट्या परीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहितची छकुली समायरा गोड हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे.

रोहित शर्मा रितिका यांचे डिसेंबर 2015 मध्ये लग्न झाले होते. गेल्या वर्षी 31 डिसेंबरला या दांपत्याच्या घरी पाळणा हलला. त्यावेळी रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. हा दौरा अर्धवट सोडून रोहित मुंबईत परतला होता. यावेळी रोहितने मुलीचा फोटो शेअर करत समायरा नाव ठेवल्याचे जाहीर केले होते.


View this post on Instagram

❤️

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh) on

दरम्यान, रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीत व्यस्त आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ दोन टी-20 आणि पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी हिंदुस्थानात येत आहे. या दौऱ्यात विजय मिळवून विश्वचषकाचा हिंदुस्थानच दावेदार असल्याचे सिद्ध करण्याची संधी हिंदुस्थानकडे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या