माजी रणजीपटू भरत ठाकरे यांचे निधन

सामना प्रतिनिधी । नागपूर

विदर्भाचे माजी रणजीपटू व निवड समितीचे सदस्य भरत ठाकरे यांचे सोमवारी पहाटे चारला अल्प आजाराने निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी अर्चना, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ते कर्करोगाने आजारी होते.

अष्टपैलू क्रिकेटपटू राहिलेले ठाकरे १९८५ ते ९१ या कालावधीत विदर्भाकडून १६ प्रथमश्रेणी सामने खेळले. त्यांनी ३०.९१ च्या सरासरीने एकूण ३६ गडी बाद केले. १२९ धावांत सात बळी त्यांचे करिअरमधील सर्वोत्तम प्रदर्शन राहिले. याशिवाय त्यांनी ८२ धावाही काढल्या. बॅंक ऑफ इंडियात कार्यरत ठाकरे यांनी २००३ ते २०१७ या कालावधीत निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. ठाकरे यांच्या निधनाबद्‌दल विदर्भ क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्‍त केला.