चेतेश्वरला ‘ज्युनिअर’ पुजाराचे वेध

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी संघाचा ‘द वॉल’ चेतेश्वर पुजारा लवकरच बाबा बनणार आहे. पुजाराने ट्विटरवर पत्नी पुजासोबतचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. या फोटोमध्ये पुजाराने ‘डॅडी’ नावाचा गॉगल घातला आहे, तर त्याच्या पत्नी आकाशी रंगाच्या कपड्यात दिसत आहे. पुजाराने २०१३मध्ये प्रेयसी पुजा पाबरी सोबत विवाहबंधनात अडकला होता.

पुजाराने नववर्षाच्या सुरुवातीला हा फोटो ट्वीट केला आहे. या फोटोसोबत पुजाराने, ‘पुढील वर्षी मी बाबा होईल अशी आशा करतो’, असे कॅप्शन दिले आहे. सोबत त्याने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. पुजाराचा हा गुड न्यूजवाला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हिंदुस्थानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन कसोटी, सहा एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून ५ जानेवारीपासून केप टाऊनमध्ये पहिला कसोटी सामना रंगणार आहे.