या दोन महिला क्रिकेटपटूंनी केला आपसात विवाह

2
फोटो- प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दोन महिला क्रिकेटपटू आपसात विवाहबद्ध झाल्या असून त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. या क्रिकेटपटूंचे देश वेगळे असून त्यातील एक न्यूझीलँडची तर दुसरी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे.

न्यूझीलँडच्या क्रिकेटपटूचं नाव हेली जेनसन असं असून तिच्या वैवाहिक जोडीदाराचं नाव निकोला हॅनकॉक असं आहे. हेली न्यूझीलँड क्रिकेट संघाची जलदगती गोलंदाज आहे. ती आपल्या संघाकडून सात आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका आणि 20 टी-20 मालिका खेळली आहे. तिची जोडीदार निकोला हॅनकॉक ही ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू असून ती देशांतर्गत होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळते.

गेल्या वर्षीही दोन क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील डेन वॅन निकेर्क आणि मॅरीजाने कॅप या दोघींनी आपसात विवाह करून खळबळ माजवली होती.