खेळाडूंनी राजकीय वक्तव्ये करू नयेत, जावेद मियाँदादच्या शाहिद आफ्रिदीला कानपिचक्या

सामना प्रतिनिधी । कराची 

खेळाडूंनी राजकीय व्यक्तव्य न करता खेळावर लक्ष केंद्रित करावे अशा कानपिचक्या पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी शाहिद आफ्रिदिला दिल्या. काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदिनी कश्मीरबद्दल व्यक्तव्य केल्याने मोठे वादंग निर्माण झाले होते, त्यावर कराचीत एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्त्यव्य केले आहे.

शाहिद आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी काश्मीर सांभाळणं पाकिस्तानाला पेलवणारं नाही असं विधान केलं होतं. या विधानामुळे आफ्रिदी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या वक्तव्याला भरपूर प्रसिद्धी मिळाल्यावर पाकिस्तानी समर्थकांनी आफ्रिदीवर टीकेची झोड उठवली होती. आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना  हिंदुस्थानी  माध्यमांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा आरोप त्याने केला. यानंतर अशा राजकीय वादांमध्ये पडूच नये अशी समज जावेद मियाँदाद यांनी   त्याला दिली.“ आपला खेळ खेळणं हे खेळाडूंचं काम असतं. राजकीय आणि सामाजिक टीकेपासून त्यांनी कायम दूर राहायला हवं.” असं ते म्हणाले. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान हे माजी क्रिकेटपटू आहेत, याचा उल्लेख करणे मात्र मियाँदाद यांनी टाळले.