लोकल प्रवाशांसाठी शुभसंकेत… सीएसएमटीवरून मेट्रो पकडता येणार

सामना ऑनलाईन । मुंबई

आझाद मैदान फोर्ट पासून सुरू होणाऱ्या मेट्रो- ३च्या स्टेशनला सीएसएमटी सबवे सोबत जोडण्याचा विचार सुरू आहे. यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉपरेशनला महापालिकेच्या मुख्यालयाजवळ दोन एक्झिट पॉइंट हवे असून त्यांचे खोदकाम काम सुरू करण्यासाठीची परवानगी सुद्धा पालिकेकडे मागितली आहे. या ठिकाणी दोन प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे, अशी माहिती मिळते. या सब-वे जोडणी करता परवानगी मिळाल्यास ३३.५ कि.मी. कोलाबा-वांद्रा-सीप्झ-नरिमन पांईंट आणि बीकेसीला तसेच विमानतळ आणि एमआयडीसीसारख्या औद्योगिक भागाशी सीएसएमटी जोडले जाईल. एमएमआरसीएलच्या परवानगीने महापालिका मार्गावरील फुटपाथ या कामासाठी काही काळ सार्वजनिक वापरासाठी बंद ठेवण्यात येईल,अशीही माहिती मिळते.

एका खासगी इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नागरी प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या कामामुळे सब-वे मधील दोन दुकानांचे थोडे नुकसान होईल. मात्र प्रवाशांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. विद्यमान स्ट्रिप उद्यानच्या उत्खनन आणि तोडण्याची परवानगी घेऊन ही जागा एमएमआरसीएलकडे सोपवण्याची गरज आहे. सूत्रांच्या मते सांगण्यात आले कि, सबवेच्या इथली दोन दुकाने बंद ठेवण्यास येतील पण, सबवेवरील लोकांना याची काहीही गैरसोय होणार नाही. महापालिकेने महापालिका आयुक्तापुढे अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे ज्यानंतर एमएमआरसीएलला काम सुरू करण्यास मंजुरी देण्यात येईल.