एवढी वर्षे झोपला होतात काय? उत्सव मंडळांचा सरकारच्या फतव्यांविरोधात सवाल

प्रतिनिधी । मुंबई

हिंदूंच्या सणांच्या नव्या नियमाविरोधात मंडळांनी संताप व्यक्त केला आहे. हिंदूचे सण साजरे करणाऱया उत्सव मंडळांवर कारवाई करायचीच होती तर ती यापूर्वी का नाही केली. एवढी वर्षे झोपला होतात काय, नवीन नवीन नियम कसले आणताय? असा उद्विग्न सवाल उत्सव मंडळांनी केला आहे.

सणांसाठी वर्गणी गोळा करताना संस्थांना धर्मदाय आयुक्तालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. सरकारच्या या भूमिकेला शिवसेनेनेही विरोध केला आहे तर सरकारच्या या फतव्याविरोधात मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी तीक्र संताप व्यक्त केला आहे. नागरिक स्वेच्छेने वर्गणी देतात, कोणी जबरदस्तीने वर्गणी गोळा करीत नाही. असे असतानाही सरकार नको ते नियम कसले आणतेय, यापूर्वी का नाही केली कारवाई? असा सवाल उत्सव मंडळांनी केला आहे.