लोकसंस्कृती…आम्ही ठाकर… ठाकर..

डॉ. गणेश चंदनशिवे

अरण्यात मूळ मानव सापडतो. अजूनही. त्यांच्या प्रथा, संस्कृतीतून

पली मूळ संस्कृती आदिवासी अशी असून मानवनिर्मितीच्या उक्रांतीपासून तो निसर्गाच्या सान्निध्यात जंगल, दऱयाखोऱया, डोंगरकपारीत वास्तवात असायचा. यांनाच अदीमसंस्कृती किंवा आदिवासी संस्कृती म्हणतात. ते म्हणतात, ‘वनदेवा आम्हाला माफ कर. तुझ्या ठिकाणी आम्ही एक सुंदर रोपटं लावू, त्याला वाढवू.’ या प्रकारे माफी मागून ते अरण्याप्रती प्रेम व्यक्त करतात. या आदिवासींमधील एक प्रमुख जमात म्हणजेच आदिवासी ठाकर जमात होय. आदिवासी ठाकर हे प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोंगराळ भागात, ठाणे, रायगड, पुणे, नगर आणि नाशिक या भागांत वास्तव्यास असतात. त्यांच्या वस्तीस ठाकरवाडी म्हणून संबोधतात. ठाकरवाडय़ा प्रामुख्याने डोंगरपोटी रानावनाच्या शेजारी असतात. त्यांच्या उपजीविकेची साधने आणि दैनंदिन गरजा अरण्याशी निगडित असतात. ठाकर जमात मुळातली शिकारी जमात. कालमानापरत्वे शिकारी जीवन जरी संपुष्टात आले असले तरी त्यांच्या जीवनाचे अनेक अवशेष त्यांच्या पारंपरिक रूढी आणि लोककलांमधून पाहावयास मिळतात.

ठाकरी लोकनृत्ये, परंपरागत लोकनाटय़ यांचे विषय आणि आविष्कार शिकारी आयुष्याशी निगडित असतात. आदिवासी ठाकर जमात आपल्या दैनंदिन जीवनाला निसर्गाच्या सान्निध्यात जंगलाच्या संगतीत नाचगाणी गात आनंदाने काळ व्यतीत करतात. पारंपरिक नाचगाणी हे त्यांच्या नैसर्गिक जीवनाचे अविभाज्य अंग आहे.

ठाकरांच्या पारंपरिक लोकनृत्याप्रमाणेच त्यांचा तमाशासुद्धा वैशिष्टय़पूर्ण असतो. मराठी मातीतील तमाशा ठाकरी भाषेत सादर करण्याची परंपरा या जमातीत अतिप्राचीन आहे. गणगवळण, रंगबाजी आणि वग या तमाशाच्या पारंपरिक बाज ठाकरी बोलून आविष्कृत होतो. त्याच्या लहेगावरून ठाकरी तमाशाची मजा काही वेगळाच आनंद देऊन जाते. कोकणातील ठाकर आदिवासी घाट चढून यावलमध्ये जाऊन शिमगा मागत फिरतात. दारावर जाऊन बाण्या मागतात त्यालाच ठाकरी गंमत असे म्हटले आहे.