खूषखबर, गॅस सिलेंडर झाला स्वस्त

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

महागाईने त्रासलेल्या सामान्यांसाठी एक आनंदाची बातमी. गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. तेल कंपन्यांनी नव्या वर्षात गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत साडेचार रूपये कमी करण्यात आले आहेत.

दैनंदिन वापराच्या १४.२ किलोच्या गॅसची ४ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये अनुदानित गॅसची किंमत ४९५.६९ इतकी आहे. कोलकतामध्ये ही किंमत ४९८.४३, मुंबईमध्ये ४९३.३८ तर चेन्नईमध्ये ४८३.६९ इतकी आहे. तसेच १९ किलो व्यावसायिक वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची १४५१ रूपयांवरुन १४४७ करण्यात आली आहे. म्हणजेच घरगुती वापराच्या गॅसची किंमत साडेचार रुपयांनी कमी झाली असून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये चार रूपयांची कपात करण्यात आली आहे. सध्या नागरिकांना एकूण १२ गॅसची सबसिडी मिळते. ही सबसिडी ३२५.६१ रूपये होती. त्यामध्येही ४.६१ रुपयांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरीकांना ३२० रुपये सबसिडी मिळणार आहे.