कटलेटस्

साहित्य : १ वाटी तयार भात, १ वाटी सुक्या वाटाण्यांची उसळ, ४ ब्रेडचे स्लाईस, १ वाटी वाफवलेला कोबी, २ मोठे कांदे, १ इंच आले, ४/५ हिरव्या मिरच्या, २-३ डाव चण्याच्या डाळीचे पीठ, थोडा रवा, चवीनुसार मीठ

कृती : सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा. थोड्या वेळाने तेलावर परतवून घ्यावा. आले-मिरच्याही बारीक चिराव्यात. नंतर रवा सोडून इतर सर्व वस्तू एकत्र कराव्यात त्याचे लिंबाएवढे गोळे तयार करावेत. एका छोट्या डिशमध्ये थोडासा रवा टाकून तयार केलेल्या पिठाचा एक गोळा त्यात ठेवून बोटांनी जरा जरा चपटा करावा. वरही थोडा रवा घालावा व कागदावर उपडे करावे म्हणजे छान गोल आकाराचे कटलेट तयार होईल. त्याच्या कडाही रव्यात घोळाव्यात. ३-४ कटलेट तयार झाले की, तव्यावर तेल टाकून तांबूस रंगावर तळून घ्यावीत. चिंचेच्या चटाणीसोबत हे कटलेट छान लागतात.