द. मा. मिरासदार

301


मेधा पालकर

खुसखुशीत कथांमधून बालचमूंपासून वयोवृध्दांना खदखदून हसविणारे, ज्यांच्या गोष्टी रसिकांना खिळवून ठेवतात ते सर्वांचे लाडके ज्येष्ठ साहित्यिक, कथाकथनकार प्रा. . मा. मिरासदार यांनी नुकतीच वयाची ९० वर्षे पूर्ण केली. पुण्यात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तोही ७ विविध संस्थांतर्फे.

d-m-mirasdar

प्रा. . मा. मिरासदार हे सर्वामध्येदादासाहेबम्हणून ओळखले जातात. याच दादासाहेबांचा जन्म सोलापूर जिल्हय़ातील अकलूज या गावी १४ एप्रिल १९२७ साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर येथे तर, महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे स. . महाविद्यालयात झाले. त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात पत्रकार म्हणून केली. काही काळ ते ना. सी. फडके संपादित साप्ताहिकझंकारमध्ये लेखन करत होते. १९५२ नंतर मात्र त्यांनी शिक्षक म्हणून पंढरपूर व पुणे येथे काम केले. संभाजीनगरमध्ये देवगिरी महाविद्यालय येथे आणि पुढे गरवारे महाविद्यालय, पुणे येथे ते मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत राहून निवृत्त झाले. मराठी साहित्यात कथालेखक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण जीवनावर त्यांनी लिहिलेल्या कथा विशेष गाजल्या. मराठी साहित्यात विनोदी साहित्याची परंपरा मोठी आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, पु. . देशपांडे यांनी निर्माण केलेली विनोदी साहित्याची समृध्द परंपरा मिरासदारांनी पुढे चालवली. एवढेच नाही तर ग्रामीण वातावरण आणि विनोदी कथा या दोन धारांना एकत्र आणून एक स्वतंत्र वाट तयार केली. मराठी साहित्याला त्यांनी दिलेली ही मोठी देणगी मानली जाते. एकूण वीस पेक्षा जास्त कथासंग्रह, रूपांतरित कादंबऱया आणिमी लाडाची मैना तुमचीहे वगनाटय़ असे लेखन केले. चित्रपट लेखनाच्या क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली असून, एक डाव भुताचा, ईर्षा, ठकास महाठक, गोष्ट धमाल नाम्याची आदी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. उत्कृष्ट पटकथा संवाद लेखनासाठी त्यांना अनेक महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त झाले असून, लेखक म्हणून त्यांचा गदिमा पुरस्कार, अत्रे पुरस्कार, काकासाहेब गाडगीळ पुरस्कार, दीनानाथ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. १९९८ साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या ७१ व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील व द. मा. मिरासदार यांनी महाराष्ट्रात, देशात आणि परदेशात कथाकथनाचे हजारो कार्यक्रम करून मराठी कथेला लोकप्रिय केले. लेखनाबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यही केले. . भा. विद्यार्थी परिषदेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेली भाषणे गाजली. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्षपदही भूषविले. शिवाय संस्कार भारतीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. साहित्यातील त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये पुणे महानगरपालिकेचा महर्षी काल्मीकी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य क संस्कृती मंडळाचा किंदा जीकनगौरक पुरस्कार, एक डाक भुताचा आणि ठकास महाठक या दोन चित्रपटांच्या संकाद लेखनाबद्दल पारितोषिके, प्राचार्य शिकाजीराक भोसले स्मृती पुरस्कार, पुलोत्सकातील कार्यक्रमात पु. . जीकनगौरक सन्मान. विनोद हा माणसाचे दुःख घालवू शकत नाही. पण दुःख हलके करण्याचे सामर्थ्य विनोदात आहे, असे द. मा. मिरासदार सांगतात. त्यांच्यागप्पांगणमधीलसिनेमाचे दिवसच्या कथेतील एक किस्सा

गंमत काय झाली, चित्रीकरणाच्या वेळी त्या झाडाखाली एक गाय घास चघळत उभी होती. कुणाचेच तिच्याकडे लक्ष नव्हते. फळ झाडावरून खाली पडले, त्याच वेळी गायीने शेण टाकले. प्रसंगाचे चित्रीकरण झाले आणि काढलेली फिल्म उलटी फिरवली. चमत्कार बरोबर जमला होता. पण एकच घोटाळा झाला होता. ते फळ जमिनीवरून उठून वर देठाला लटकायचे, त्याच वेळी ते शेणही उठायचे आणि वेगाने वर जाऊन गायीच्या पोटात गडप व्हायचे!!’

आपली प्रतिक्रिया द्या