डी. एस. कुलकर्णी यांना हायकोर्टाचा दिलासा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ग्राहकांची फसवणूक केल्याचे आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज एक आठवड्य़ाचा अंतरीम जामीन मंजूर केला. एक लाखाच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे कुलकर्णी दांपत्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

गरीबांसाठी मुंबईतील एखादा कोपरा तरी सोडा!
कफ परेड येथील डीएसके गृहनिर्माण संकुलाला लागून असलेल्या सार्वजनिक उद्यानात लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नाकारणाऱ्या डीएसके सोसायटीला मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलेच झापले. शहरातील सार्वजनिक जागा या सर्वांसाठी आहेत. ‘अरे गरीब माणसांसाठी मुंबई शहरातील एखादा कोपरा तरी सोडा’ या शब्दांत न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांनी डी. एस. के. सोसायटीला खडसावले. डीएसकेकडून या जागेचा व्यावसायिक वापर सुरू आहे. त्याविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते संजय कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.