द.मा.मिरासदार यांना ‘साहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह’

सामना ऑनलाईन ।  मुंबई

आत्रेय आणि चौरंग, मुंबई यांच्यावतीने साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘साहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांना जाहीर झाला आहे. येत्या सोमवारी, १३ ऑगस्टला पुणे येथे या पुरस्काराने मिरासदार यांना गौरविण्यात येणार आहे. माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते हे मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट हेदेखील असणार आहेत. याप्रसंगी संपादक मधुकर भावे हे आचार्य अत्रेच्या आठवणींना उजाळा देणार असून डॉ.गिरीश ओक यांची प्रमुख भूमिका असलेल्या आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा प्रयोगही यावेळी सादर होणार आहे.