कोकणात धावणार ‘तुतारी एक्स्प्रेस’

सामना ऑनलाईन । मुंबई

दादार-सावंतवाडी रेल्वेच्या नावात बदल करण्यात आला आहे. कोकणात धावणाऱ्या दादर सावंतवाडी रेल्वेचे नाव बदलून आता ‘तुतारी एक्स्प्रेस’ असे करण्यात आले. मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. सहा वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना कमी वेळेत कोकणात जाणे सोपे झाले होते. प्रवाशांनीही दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसचा पसंती दिली होती.

दादरमध्ये रेल्वे मंत्री सुरेश यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात दादर-सावंतवाडी एक्स्प्रेसचे ‘तुतारी एक्स्प्रेस’ असे नामकरण करण्यात आले. सुप्रसिद्धी मराठी कवी कृष्णाजी केशव दामले (केशवसुत) यांच्या सन्मानार्थ या रेल्वेच्या नावात बदल करण्यात आला आहे. केशवसुत यांची ‘तुतारी’ कवीता प्रसिद्ध आहे, त्यावरून हे नाव देण्यात आले आहे.