कालकथित दादासाहेब रुपवते स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन

सामना ऑनलाईन । मुंबई

आंबेडकरी चळवळीमधील जेष्ठ कार्यकर्ते आणि माजी मंत्री कालकथित दादासाहेब रुपवते यांच्या १९ स्मृति दिनानिमित्त ‘कवितेच्या अंगणात’ हा काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या काव्यवाचनच्या कार्यक्रमात प्रसिद्ध कवियत्री छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर आदी सहभागी होणार आहेत. तर प्रमुख वक्त्या म्हणून जेष्ठ साहित्यिक उर्मिला पवार आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रेमानंद रुपवते असणार आहेत. हा कार्यक्रम २३ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजता वांद्रे पूर्व, शासकीय वसाहत येथील चेतना महाविद्यालयाच्या सी. आय. एम. आर सभागृहात होणार आहे.