बोल बजरंग बली की जय!

फोटो प्रतिकात्मक

सामना प्रतिनिधी , मुंबई

‘बोल बजरंग बली की जय’ असा नारा देत काल  मुंबई-ठाण्यासह राज्यभरात गोविंदांच्या टोळ्यांनी लोण्यावर डल्ला मारला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नाक्यानाक्यावर गोविंदांचा जल्लोष सुरू होता. दहीहंडीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे या सोहळ्यात आणखीनच रंगत आणली. सेलिब्रिटींची उपस्थितीही खास आकर्षण ठरले.

गोरेगावात दहीहंडी रक्कम केरळ पूरग्रस्तांना

केरळवर कोसळलेल्या पुराच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी सण साजरा न करता त्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम केरळ पूरग्रस्तांना देऊन समाजसेवेचा आदर्श शिवसेनेच्या गोरेगाव येथील शाखेने घालून दिला. गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ रुग्णालयाशेजारील शिवसेना शाखेने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द केला. दरवर्षी या दहीहंडीत 180 हून अधिक गोविंदा सलामी देतात. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस दिले जाते. त्याचप्रमाणे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. मात्र यंदा हा उत्सव रद्द करून यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती विधानसभा संघटक दिलीप शिंदे यांनी दिली. यासाठी झालेल्या बैठकीला उपकिभागप्रमुख लक्ष्मण नेहरकर, शाखाप्रमुख कमलाकर नांदोसकर, भरत बोऱ्हाडे, युवासेना विभाग अधिकारी रोहन शिंदे आदी उपस्थित होते. हा निधी लवकरच शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन कीर्तिकर, विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्या उपस्थितीत केरळ मदतकार्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.

दहिसरच्या दहीहंडीत शहीद हुतात्म्यांना मानवंदना!

old-man

‘संस्कार प्रतिष्ठान’ आयोजित दहिसर येथील दहीहंडीत पहिली सलामी शहीद जवानांना देण्यात आली. दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशन येथे सकाळी 11 काजल्यापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात शहीद शुभम् सूर्यकांत मुस्तापुरे कुटुंबीय उपस्थित होते. जम्मू-कश्मीरमधील कृष्णा घाटी येथे सीमारेषेकर एप्रिल महिन्यात पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात हिंदुस्थानी सैन्यातील जकान शुभम् मुस्तापुरे (20) शहीद झाला. परभणीतील कोनरेकाडी गाकाचा शुभम् कयाच्या 18 क्या कर्षी देशाच्या रक्षणासाठी सैन्यात दाखल झाला. आज प्रतिष्ठानच्या कतीने शिकसेना उपनेते किनोद घोसाळकर यांच्या हस्ते मुस्तापुरे कुटुंबीयांना 51 हजार रुपयांचा धनादेश देऊन मानवंदना देण्यात आली. याकेळी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, माजी नगरसेविका हंसाबेन देसाई, सुनील चक्हाण, भालचंद्र म्हात्रे, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, शाखाप्रमुख राजू इंदुलकर, मिलिंद म्हात्रे, प्रयेश पाटील, श्रीधर रावराणे, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेकिका तेजस्की घोसाळकर क मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर उपस्थित होते. दहीहंडीच्या उत्सवात लहानथोर चांगलेच रंगून गेले होते. दादर येथे आयोजित उत्सवात कृष्णाच्या वेशभूषा केलेला  चिमुकला सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

जय भवानी सेवा मंडळाच्या वतीने शिवसेना सिंधुदुर्ग-कोल्हापूर संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यातर्फे आयोजित ताडदेव येथील ममता चषक मानाची हंडी नवी जायफळवाडी मंडळाने फोडली. यावेळी शिवसेना नेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, रवींद्र मिर्लेकर, मीना कांबळी उपस्थित होते. युवा जिद्दी मराठा पथकाच्या गोविंदांनी महाराष्ट्र पोलिसांना अशी कडक सलामी दिली.

दिंडोशीत हिंदुत्वाचा गजर

शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार विभाग प्रमुख सुनील प्रभू आयोजित ‘परंपरा उत्सवाची, शान हिंदुत्वाची’ दिंडोशीच्या मानाच्या दहीहंडी उत्सवाचे या शिवसेना दिंडोशी विधानसभा पुरस्कृत दहीहंडी उत्सवात अमरचक्र गोविंदा पथकाने प्रचंड जिद्दीचे दर्शन दाखवत आठ थर लावून मानाच्या दहीहंडीला सलामी दिली.

img-20180903-wa0010-sunil-prabh

दहीहंडी उत्सवात सीमेवर शहीद जवान शुभम् मुस्तापुरेसह सर्व शहीद जवानांना गोविंदा पथकांसह उपस्थित जनतेनेदेखील दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सलामी दिली. स्थापत्य समिती (उपनगर) अध्यक्ष, नगरसेविका, विभाग संघटक साधना माने, सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष वेळे, नगरसेवक सुहास वाडकर, आत्माराम चाचे, तुळशीराम शिंदे, नगरसेविका विनया विष्णू सावंत, विधानसभा संघटक प्रशांत कदम, विष्णू सावंत, विधानसभा संघटक अनघा साळकर, उपविभागप्रमुख सुनील गुजर, काशीनाथ (भाई) परब, प्रदीप निकम, गणपत वारिसे, उपविभाग समन्वय कृष्णा देसाई, सोपान राजूरकर, प्रशांत घोलप, कृष्णकांत सुर्वे, उपविभाग संघटक रीना सुर्वे, पूजा चौहान,शालिनी सावंत, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, रूपेश कदम उपस्थित होते. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना महामंडळावर शिवसेना उपनेते, माजी आमदार डॉ. विनोद घोसाळकर यांची सभापती (राज्यमंत्री दर्जा)पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना दिंडोशी विधानसभेतर्फे शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

मागाठाण्यात व्यसनमुक्तीचा संदेश; 1000 गोविंदांची सलामी

smita

मागाठाणे येथे शिवसेना व तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगरात, देवीपाडा मैदान येथे दहीहंडी माहेत्सवाचे आयोजन  आमदार प्रकाश सुर्वे यांनी केले. या दहीहंडी महोत्सवाद्वारे तंबाखू-गुटखा व्यसनमुक्तीचा तसेच प्लॅस्टिक-थर्माकोल मुक्तीचा संदेश देण्यात आला.  मनोरंजन आणि प्रबोधनाची सांगड घालणाऱ्या या दहीहंडी उत्सवात सिनेकलाकारही सामील झाले.  महिला पथकांना 5000 रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले आहे. मागाठाणे दहीकाला महोत्सवात मुंबई, ठाणे येथील अंदाजे 1000 दहीकाला पथके सलामी देण्यासाठी उपस्थित होती. दहीकाला महोत्सवात विविध संगीत, नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रेटी आवर्जून उपस्थित होते. सिनेतारका रविना टंडन, रश्मी देसाई. राधिका आपटे, मुग्धा गोडसे, श्रुती मराठे, तेजा देवकर, स्मिता गोंदकर, तसेच ढोलकीच्या तालावर फेम नृत्यांगनांनी दिलखेचक अदा पेश केली.

दृष्टिहीन मुलींनी फोडली ‘आयडियल’ची दहीहंडी

आयडियल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दादरमधील छबिलदास रोड येथे यंदाही दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘स्टार प्रवाह’च्या ‘गोठ’ आणि ‘नकळत सारे घडले’ या मालिकांतील कलाकारांनी येथे सहभागी होऊन स्पर्धकांचा उत्साह वाढवला. सेलिब्रेटींची दहीहंडी फोडण्याचा मान अभिनेता समीर परांजपे याने पटकावला. या हंडीचे आकर्षण ठरले ते नयन फाऊंडेशनच्या दृष्टिहीन मुलींनी फोडलेली हंडी. या गोपिकांनी चार थर लावून ही हंडी फोडली आणि उपस्थितांची मने जिंकली.

घाटकोपर गोळीबार चौक येथील शिवसेना शाखेच्या वतीने आयोजित दहीहंडीत अवयवदानाचा संदेश देण्यात आला. नागरिकांकडून अवयवदानाचे फॉर्म भरून घेण्यात आले. यावेळी नगरसेवक तुकाराम पाटील यांनी आपल्या कुटुंबीयांसह अवयवदानाचा संकल्प सोडला. या शिबिराला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, रत्नागिरी संपर्क प्रमुख सुधीर मोरे, विभागप्रमुख राजेंद्र  राऊत, नगरसेवक दीपक हांडे, संजय भालेराव, सुभाष पवार आदी उपस्थित होते.

नाक्यानाक्यावरील दहीहंडी फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदांवर घराघरातून पाण्याचा वर्षाव करण्यात येत होता. यामुळे प्रवासाने हैराण झालेल्या गोविंदाना गारव्याचा अनुभव घेता येत होता.