राम कदमांना दहीहंडी समन्वयक समितीचा दणका, उत्सवावर बहिष्कार

ram-kadam-bjp-actress

सामना ऑनलाईन । मुंबई

‘तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणायला मदत करेन, कधीही फोन करा’ असे बेताल विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपरच्या दहीहंडी कार्यक्रमात केले होते. तसेच याच कार्यक्रमात अभिनेत्री प्राची देसाईच्या डायलॉगसाठी सर्वात वरच्या थरावर पोहोचलेल्या पथकाला दटावणीच्या सुरात खाली उतरण्यात भाग पाडले होते. याची दखल घेत नाराज झालेल्या दहीहंडी समन्वय समितीने राम कदम यांना दणका दिला आहे.

मी माता-भगिनींची माफी मागतो !

दहीहंडी पथकाला खाली उतरण्यास भाग पाडल्याने दहीहंडी समन्वयक समितीने राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी समन्वयक समितीचे गोविंदा पथक राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आधीच मुलींबाबत वादग्रस्त विधान करून गोचीत सापडेले राम कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नक्की काय झालं होतं?
घाटकोपर येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात राम कदम यांनी अनेक सिनेतारे-तारकांना आमंत्रीत केले होते. त्यापैकी एक प्राची देसाई हिने कार्यक्रमात एक डायलॉग म्हटला. परंतु याच दरम्यान एका गोविंदा पथकाने थर रचले. या पथकाने जवळपास सात ते आठ थर लावले होते. यामुळे भडकलेल्या राम कदम यांनी प्राची देसाईच्या डायलॉगला प्राधान्य देऊन गोविंदांना वरच्या थरावरून खाली उतरण्यास भाग पाडले होते.

पाहा व्हिडीओ : नक्की काय घडले होतं?