दहिसरमध्ये घुमणार जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा दम

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना शाखा क्रमांक २च्या वतीने आणि श्री साईबालाजी मित्र मंडळाच्या सहकार्याने येत्या शुक्रवारपासून मुंबई उपनगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशन ग्राऊंड, विद्यामंदीर शाळेसमोर, दहीसर (पूर्व) येथे खेळवण्यात येणाऱया या स्पर्धेचे उद्घाटन विभागप्रमुख विलास पोतनीस व ज्येष्ठ सिनेनट अरुण नलावडे यांच्या उपस्थित पार पडेल. तसेच शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारीला बक्षीस वितरण सोहळा रंगेल.

उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे यांचे या स्पर्धेच्या आयोजनासाठी मोठे योगदान लाभले आहे. विधानसभा संघटक कर्णा अमीन, महिला उपविभाग संघटक शकुंतला शेलार, शाखाप्रमुख अतुल तावडे, शाखासंघटक शर्मिला पाटील, कार्यालय प्रमुख विनोद जाधव, महेश वेंगुर्लेकर, बाबू यर्रा, पंढरी कडू, दिनेश वाकोडे हे स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत आहेत.

या स्पर्धेला पर्यावरणमंत्री रामदास कदम, शिवसेना नेते खासदार आनंदराव अडसूळ, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, उपनेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुळकर, महिला विभाग संघटक रश्मी भोसले, आमदार प्रकाश सुर्वे, प्रकाश कारकर, प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेविका सुजाता पाटेकर,तेजस्विनी घोसाळकर, नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद, संजय घाडी, हर्षल कारकर आणि अभिषेक घोसाळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.