दैनिक ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य ‘मुंबई मोमेंट्स’चे विजेते


सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई प्रेस क्लबने वृत्तपत्र छायाचित्रकारांसाठी आयोजित केलेल्या ‘मुंबई मोमेंट्स-2019’ या कॅलेंडर स्पर्धेत दैनिक ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य विजेते ठरले. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिच्या हस्ते त्यांना 12 हजारांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ‘मुंबई मोमेंट्स-2019’साठी वैद्य यांच्या काळाचौकी येथील महागणपतीच्या विसर्जन सोहळय़ाच्या छायाचित्राची निवड झालेली आहे.