दलाई लामा यांनी मागितली माफी

सामना ऑनलाईन । बंगळुरू

जवाहरलाल नेहरू हे ‘आत्मकेंद्री’ होते. पंतप्रधानपद स्वतःला मिळवण्यासाठी त्यांनी मोहम्मद अली जीना यांना पंतप्रधान करण्याच्या गांधीजींच्या इच्छेचा अनादर केला, या आपल्या वक्तव्याबद्दल तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी आज येथे माफी मागितली. माझ्या विधानावरून वाद उभा राहिला आहे. मी चुकीचे काही बोललो असेन तर माफी मागतो, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नेहरू हे ‘आत्मकेंद्री’ होते, म्हणजे तुम्हाला नेमके काय म्हणायचे होते, असे पत्रकारांनी दलाई लामा यांना विचारले. त्यावर उत्तर देताना त्यांनी गोव्यात बुधवारी केलेल्या विधानावर माफी मागितली.