स्टेन आला रे…

सामना ऑनलाईन । मुंबई

तेज गोलंदाज डेल स्टेनचे दक्षिण आफ्रिकन संघात पुनरागमन झाले आहे. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याला दक्षिण आफ्रिकेच्या चमूत स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची तसेच दोन वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी फाफ डय़ुप्लेसिस याला कायम ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी ए. बी. डिव्हिलीयर्सच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकन संघ पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा चमू
फाफ डय़ुप्लेसिस (कर्णधार), हाशीम अमला, तेम्बा बवुमा, क्विण्टॉन डी कॉक, थिऊनिस दी ब्रुन, डीन एल्गार, हेनरीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, लुंगी एनगिडी, वेरनॉन फिलॅण्डर, कॅगिसो रबाडा, तबरेज शम्सी, डेल स्टेन, शॉन बर्ग.

लक्ष्य ५०० बळी अन् वर्ल्ड कपचे जेतेपद
डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळी मिळवण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले असून वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्यही त्याला व्हायचे आहे. तसेच यासाठी तो वयाच्या ३८ किंवा ३९व्या वर्षांपर्यंत खेळत राहणार आहे.