‘डान्स महाराष्ट्र डान्स’ २४ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला

सामना ऑनलाईन । मुंबई

‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या महाडान्स स्पर्धेच्या ऑडिशनला विविध शहरातून आलेल्या स्पर्धकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. झी युवावर ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा नृत्यावर आधारित कार्यक्रम २४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रत्येक बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी रात्री ९:३० वाजता हा कार्यक्रम असणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर या कार्यक्रमाचे परीक्षक असून अभिनेता सुव्रत जोशी या कार्यक्रमाचं सूत्र संचालन करणार आहे. ऑडिशनचे बिगुल फुंकल्यानंतर नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांमधून सुमारे ५००० ते ६००० स्पर्धकांनी विविध गावांमधून आणि शहरांमधून येऊन आपले टॅलेंट सादर केले. या सर्व टॅलेंटमधून काही निवडक आणि उत्कृष्ट स्पर्धक घेऊन ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे.