‘या’ रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ

सामना ऑनलाईन । मुंबई

यो यो हनिसिंग, बादशाह, रफ्तार ह्या टॉपमोस्ट ‘रॅपर्स’ची आजच्या युवा पिढींमध्ये जास्त क्रेज पाहायला मिळते आहे. पाश्चिमात्य देशातून आलेला ‘रॅप’ गाण्यांचा हा प्रकार हिंदुस्थानातही हिट होत आहे. डॅनी सिंग यांनी गायलेले “आयटमगिरी” हे रॅपसॉंग सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मराठी- हिंदी फ्युजन असलेले हे गाणे आजच्या तरुणाईच्या ओठी आहे. “आयटमगिरी” या रॅपसॉंगनंतर हिंदी आणि पंजाबी फ्युजन असलेले “दारू पीने दे” हे रॅप सॉंग नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर या गाण्याला लाखो लोकांनी पाहिले आहे.

डॅनी सिंग आणि आशिष या दोघांनी मिळून या गाण्याला संगीत दिले आहे. यातील गाण्याचा भाग हा आशिष यांनी गायला असून त्यातील रॅपचा भाग डॅनी यांनी गायला आहे. त्याचप्रमाणे हे गाणे अधिक रेखीव दिसण्यासाठी ऐश्वर्या जाधव यांनी कोरिओग्राफी केली आहे. व्हीजे प्रॉडक्शन या बॅनरखाली डँनी सिंग यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. रॅपर डॅनी सिंग यांचे हे गाणे देखील तरुणाईला थिरकवल्याशिवायराहूच शकत नाही.