दशमी पुरी

सामना ऑनलाईन

साहित्य – १ किलो पीठ, १/२ लीटर दूध, १/४ चमचे मीठ, १०० ग्रॅम   साखर, ५० ग्रॅम खसखस,  १०० ग्रॅम तूप किंवा तेल मोहनासाठी आणि तळण्यासाठी

कृती – प्रथम दुधात साखर आणि थोडेसे पाणी मिळवून इतके गरम करावे की साखर विरघळावी आणि दूध फक्त कोमट रहावे. आता पिठात खसखस, मीठ आणि मोहन एकजीव करावे. दूध घेऊन खूप कडक कणीक मळावी. मळलेली कणिक ओल्या कापडाने अर्धा तास झाकावी. पुरी बनवते वेळी पुन्हा मळून घ्यावी. छोटय़ा छोटय़ा गोळ्या बनवून पुरी लाटावी. गरम तुपात किंवा तेलात तळावी.  पाहुण्यांना पुरीचा नवीन प्रकार म्हणून खाऊ घालायला आणि प्रवासाकरिता सोयीची अशी दुधात मळलेली ‘दशमी पुरी’ न्याहारी किंवा मधल्या वेळेतही खाता येते.