पाच राज्यातील निवडणुकांचा तारखा जाहीर,११ मार्चला होणार मतमोजणी

2

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ५ राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. गोवा,पंजाव.उत्तराखंड, मणिपूर आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.सगळ्यात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये ७ टप्प्यात मतदान होणार असून इथे ४०३ विधानसभेच्या जागा आहे. इथले मतदानासाठीचे टप्पे अशा पद्धतीने आहेत.
पहिल्या टप्प्यातील मतदान-११ फेब्रुवारीला
दुसऱ्या टप्प्यातील मतदान-१५ फेब्रुवारीला
तिसऱ्या टप्प्यातील मतदान-१९ फेब्रुवारी
चौथ्या टप्प्यातील मतदान-२३ फेब्रुवारी
पाचव्या टप्प्यातील मतदान-२७ फेब्रुवारी
सहाव्या टप्प्यातील मतदान-४ मार्च
सातव्या टप्प्यातील मतदान-८ मार्च
गोवा आणि पंजाबमध्ये मतदान ४ फेब्रुवारीला होणार आहे. तर उत्तराखंडचं मतदान १५ फेब्रुवारीला होणार आहे. मणिपूरमध्ये २ टप्प्यात मतदान होणार आहे. मणिपूरचं पहिल्या टप्प्यातील मतदान ४ फेब्रुवारीला होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ८ मार्चला होणार आहे. या सगळ्या राज्यांसाठीची मतमोजणी मात्र एकाच तारखेला म्हणजेच ११ मार्चला होणार आहे.
या पाच राज्यात मिळून एकूण ६९० विधानसभेच्या जागा आहेत. या राज्यातील १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी १.८५ लाख मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.