पैलवान दत्तात्रय तुर्केवाडकरची वरिष्ठ राष्ट्रीय कुस्तीसाठी निवड

सामना ऑनलाईन । मुंबई

गोराई, बोरिवलीचा मराठमोळा मल्ल पैलवान अभिषेक दत्तात्रय तुर्केवाडकर याची इंदूर (मध्य प्रदेश) येथे १७ नोव्हेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. अभिषेक ७४ कि.ग्रॅ. वजनी गटात राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरण (साई) कांदिवली येथे कुस्तीचा सराव करणाऱ्या अभिषेकने यापूर्वी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचे सहा वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्याने ‘महाराष्ट्र केसरी’त कास्य पदक, मुंबई महापौर व नवी मुंबई महापौर केसरीत सुवर्ण पदक, पुणे महापौर कसरीत कास्य पदक अशी चमकदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्र रेसलिंग चॅम्पियन्स लीगसाठीही (एमडब्ल्यूसीएल) अभिषेकची निवड झाली आहे.