शहिदांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार: मुलीने केला अखेरचा सलाम तर कुठे अडीच वर्षाच्या चिमुरड्याने दिला मुखाग्नी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलावामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. सर्व शहिदांचे पार्थिव त्यांच्या त्यांच्या घरी पाठवून अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जमावाचे अश्रू आणि घोषणा थांबत नव्हत्या.

उत्तर प्रदेशचे निवासी शहीद प्रदीप सिंह यादव यांच्या पार्थिवाला त्यांची मुलगी सुप्रियाने मुखाग्नी दिला.

supriya

मुखाग्नी दिल्यानंतर सुप्रिया धाय मोकलून रडत होती आणि तिथेच बेशुद्ध पडली.

supriya-2

 

उत्तर काशीचे रहिवाशी शहीद मोहनलाल रतुडी यांचे पार्थिव देहरादूनमध्ये आणले गेले. त्यांना मुखाग्नी देण्यापूर्वी त्यांच्या मुलीने त्यांना सलाम केला.

rataudi-daughter

 

उत्तराखंडचे रहिवासी असलेले शहीद वीरेंद्र सिंह यांना अडीच वर्षाचा एक मुलगा आहे. त्याचे नाव बयान असून त्यानेच आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला.

virendra-sing-rana