सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबियांच्या गाडीला अपघात, १० जण जखमी

सामना ऑनलाईन । सांगली

पणन राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबियांच्या गाडीला प्रचारावेळी अपघात झाला. या अपघातात खोत यांच्या दोन्ही सुनांसह १० जण जखमी झाले. जखमींमध्ये महिलांची समावेश असून तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. सागर यांच्या प्रचारासाठीच गाड्या निघाल्या होत्या. सकाळी ११ च्या सुमारास इस्लामपूर-आष्टा मार्गावर त्यांची तवेरा गाडी पलटी झाली. गाडीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या दोन्ही सुना आणि कुटुंबातील महिला होत्या. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. जखमींवर इस्लामपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.