मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट घडवण्याचा दाऊदचा कट?

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊन इब्राहिम त्याच्या एका भावासोबत पुन्हा तसाच हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी पाकिस्तानात राहणार दाऊदचा भाऊ आणि भारतातील त्याच्या साथीदारामधील झालेले बोलणे ट्रेस केले आहे. दाऊदच्या या तयारीची माहिती केंद्र सरकारलाही देण्यात आली आहे.

‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, दाऊद इब्राहीम आणि त्याचे काही लोक मुंबईत घातपाताच्या कारवाया करण्याचं प्लानिंग करत असल्याचं समोर आलं आहे. दाऊदचा भाऊ आणि भारतातील त्याच्या माणसांसोबत त्याचं झालेलं बोलणं इंटरसेप्ट करण्यात आलं आहे. या संभाषणातून एक मोठा खुलासा झाला आहे. त्यांच्या संवादामधून मुंबई पोलिसांनी मोठी माहिती हाती लागल्याचे बोलले जात आहे. पोलिस आणि केंद्रीय एजन्सी दाऊदला या कामात मदत करत असलेल्या लोकांच्या शोधात आहेत.

काही दिवसांपूर्वीच दाऊदचा लहान भाऊ इकबाल कासकरला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी इकबालला ताब्यात घेतले. इकबालसोबत आणखी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.