जेएनयू परिसरात सडलेला मृतदेह सापडल्याने खळबळ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या आवारात मंगळवारी एक सडलेला मृतदेह मिळाला आहे. जेएनयूच्या परिसरातील जंगलात सापडलेला हा मृतदेह ४० वर्षीय राम प्रवेश या व्यक्तीचा आहे. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात खळबळ माजली आहे.

जनसत्ताने या संबंधीचे वृत्त दिले आहे. पोलिसांना संशय आहे की सहा ते सात दिवसांपूर्वी या इसमाने आत्महत्या केली असावी. मयत विद्यापीठात सुरक्षा रक्षकाचं काम करत असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. जेएनयू परिसरात अधिक तपासणी करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे.