अज्ञात इसमाचा मृतदेह

सामना प्रतिनिधी । देवरूख

देवरूख येथील नावडी महा ई सेवा केंद्राच्या मागील आजूस असणार्‍या मुतारीजवळ आज सकाळी अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

किरण बाबु भुरवणे (32, तेरे बुरंबी) यांनी याची खबर संगमेश्‍वर पोलिसांना दिली. सकाळी 9.30 च्या दरम्याने भुरवणे नेहमीप्रमाणे या महा ई सेवा केंद्रात कामासाठी निघाले असता बाजुच्या मुतारीजवळ त्यांना अंदाजे 40 ते 42 वर्षांच्या इसम भिंतीला पाठ टेकून मयतावस्थेत आढळला. त्यांनी याची खबर पोलिसांना दिली. या इसमाच्या अंगावर काळ्या कॉलरचा हाफ शर्ट, निळसर रंगाची हाफ जिन्स पँट, कमरेला पट्टा आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.