पंढरपुरात नगरसेवक संदीप पवारांवर जीवघेणा हल्ला

88

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पंढरपूर नगर परिषदेचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्यावर आठ ते दहा हल्लेखोरांनी गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला. या हल्लात संदीप गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील हॉटेल श्रीराममध्ये ही घटना घडली. संदीप पवार हे आपल्या मित्रांसोबत चहा पिण्यासाठी दुपारी एकच्या सुमारास हॉटेलमध्ये आले होते.

हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहापान सुरू असताना हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश करत संदीप यांच्या दिशेने गोळीबार केला. तर इतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात संदीप पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवार यांच्यावर हल्ला नेमका कोणी आणि का? केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या