लपंडाव खेळताना पेटीत अडकला, ४ वर्षीय मुलाचा गुदमरून मृत्यू

सामना प्रतिनिधी । किनगाव

किनगाव पासून १० कि.मी. अंतरावर अंधोरी येथे ४ वर्षीय मुलाचा लोखंडी पेटीमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश दिनेश कावले असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे.

गणेश ४ जून रोजी दुपारी घरी आई व वडील कोणीही नसल्यामुळे आपल्या लहान मित्रासोबत लपंडाव खेळत होता. लपंडाव खेळता खेळता घरात असलेल्या एका लोखंडी पेटीमध्ये लपून बसला होता. परंतु झाकण बंद झाल्याने त्याचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. याची किनगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास किनगाव पोलीस ठाण्याचे स.पो. नि. सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंधोरी बिट अमलदार. पो.कॉ. धुळगुंडे हे करत आहेत.