इराणमधील अपघातग्रस्त विमानाचे अवेशष सापडले

सामना ऑनलाईन । तेहरान

असेमन एअरलाईन्सच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत. रविवारी या विमानाचा अपघात होऊन ६६ जण ठार झाल्याचं वृत्त आलं होतं. मात्र, हे विमान जाग्रोस पर्वतराजींमध्ये कोसळल्यामुळे त्याचे अवशेष शोधणं जिकीरीचं होतं. पण, अखेर त्या विमानाचे अवशेष सापडले आहेत.

एका स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, जाग्रोस पर्वतराजींमध्ये होणारी बर्फवृष्टी आणि दाट धुक्यामुळे विमानाचे अवशेष शोधण्याच्या कामात अडथळे येत होते. मात्र, मंगळवारी सकाळी हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर अवशेषांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी विमानाचे अवशेष आणि प्रवाशांचे मृतदेह सापडले आहेत.

इराणच्या असेमन एअरलाइन्सचे एटीआर ७२ डबल इंजिन टर्बीप्रॉप जातीचं हे विमान होतं. विमानाने तेहरान विमानतळाहून उड्डाण घेतले आणि ते इराणमधील ७८० किमी अंतरावरील इराणमधील यासूज नामक शहराकडे जाण्यासाठी निघाले होते. मध्य इराणच्या सेमिरोम शहराजवळच्या डेंगराळ प्रांतावरून ते जात असताना दहाव्या मिनिटाला त्याचा विमानतळाशी असलेला संपर्क तुटला. विमानतळवरील रडारवर विमान दिसेनासं झालं होतं.