आर्थिक संकटात सापडलेल्या पतीने केली पत्नीची हत्या, नागपूर हादरले

महेश उपदेव, नागपूर

नागपूरात सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका प्लायवूड व्यापा-याने पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या थरारक घटनेमुळे उपराजधानीत खळबळ उडाली. दोघांनाही गंभीर अवस्थेत मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नी मीनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पती रवीची प्रकृती गंभीर आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार कर्जबाजारीपणा आणि आर्थिक कोंडीमुळे पती – पत्नीत नेहमी वाद होत होता, काल रात्री हा वाद विकोपाला गेला आणि यातूनच रवी नागपुरे यांनी पत्नीवर फायरिंग करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला.