मोदी सरकार बॅक फुटवर; दर महिन्याला गॅस दरवाढीचा निर्णय मागे

8
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

गुजरात निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने सावध झालेल्या मोदी सरकारने दर महिन्याला घरगुती गॅस सिलिंडरमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे.

पेट्रोलियम कंपन्यांना दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या दरात ४ रुपयांनी वाढ करण्याचे आदेश जून २०१६ मध्ये केंद्र सरकारने दिले होते. त्यानंतर दरवाढीचा आदेश सरकारने ऑक्टोबरमध्ये परत घेतला. यामुळेच इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने ऑक्टोबरपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलीही वाढ केली नाही. गरीबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन देण्याच्या उज्ज्वला योजनेच्या उलट हा निर्णय असल्यामुळे सांगत मोदी सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या