दीपिका पदूकोणला हवंय ‘हे’ मंत्रीपद…  पाहा काय म्हणाली ते

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड व राजकारण याचा तसा जवळचा संबंध आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी राजकारणात देखील हात आजमावला आहे. बॉलिवूडमधील सध्याची टॉपची अभिनेत्री दीपिका पदूकोणने हिला स्वच्छ भारत अभियानाचे मंत्रीपद हवे असल्याचे तिने जाहीर केले आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात दीपिकाने तिची ही इच्छा बोलून दाखवली.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2019 या कार्यक्रमात दीपिकाला ती राजकारणात आली तर तिला कोणते मंत्रीपद स्वीकारायला आवडेल असे विचारले होते. त्यावर तिने मला स्वच्छ भारत अभियानाचे मंत्रीपद हवे असल्याचे सांगितले. ‘ राजकारणाविषयी मला फार माहित नाही. पण जर मला संधी मिळाली तर मी स्वच्छ भारतची मंत्री बनेन. मला स्वच्छतेची फार आवड आहे. जेव्हा मी लहान होते आणि मैत्रिणींकड नाईट आऊट साठी जायचे. तेव्हा मला अनेक जण नाईट आऊटसाठी बोलवायचे. मला वाटलेलं की मी खूप प्रसिद्ध आहे. पण त्यामागचं खरं कारण असं होतं की मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे कपाट व बेडरूम साफ करायचे’ असा किस्सा यावेळी दीपिकाने शेअर केला.