Video : छपाकमधील दीपिकाचा किसिंग सिन व्हायरल

2

सामना ऑनलाईन । मुंबई

अॅसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जिवनावर आधारित छपाक या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदूकोण मुख्य भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटातील तिचा पहिला लूक समोर आल्यानंतर चाहते आता तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या तिचा या चित्रपटातील किसिंग सिन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दीपिका तिचा सहकलाकार विक्रांत मास्सेला किस करताना दिसत आहे.

या चित्रपटात दीपिका लक्ष्मीच्या भूमिकेत तर विक्रांत मास्से हा लक्ष्मीचा पूर्वाश्रमीचा पती आलोक दीक्षितच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाची सध्या दिल्लीत शूटींग सुरू आहे. या शूटींगदरम्यानचे बरेचसे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एका व्हिडीओत दीपिका व विक्रांत घराच्या टेरेसवर किस करताना दिसतायत.