रणवीर-दीपिका पुन्हा एकत्र, ’83’ मध्ये कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार

2
रणवीर सिंग याची वास्तव आयुष्यातील पत्नी अभिनेत्री दीपिका पदुकोण ही 83 या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमधील हॉट आणि कारकीर्दीतील सर्वोच्च स्थानावर असणारे कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकदा मोठा पडदा शेअर करणार आहेत. रिअल लाईफमध्ये पती-पत्नी असणारे हे दोघे रिल लाईफमध्येही पती-पत्नीची भूमिका साकारणार आहेत. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघावर आधारित 83 चित्रपटामध्ये रणवीर सिंह कपिल देव यांची भूमिका साकारत असून दीपिका यात कपिल यांच्या पत्नी रोमी भाटिया भूमिका साकारणार आहे, असे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी याआधी ‘गोलियों की रासलीला – रामलीला’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ यासारख्या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. परंतु प्रत्येक चित्रपटाचा शेवट दु:खद झाला आहे. त्यामुळे चाहत्यांना आता आगामी चित्रपटामध्ये हॅपी एंडिंगवाल्या चित्रपटामध्ये पाहण्याची इच्छा आहे. ही इच्छा ’83’ चित्रपट पूर्ण करणार आहे.

’83’ चित्रपटासाठी दीपिका पदुकोणला साईन करण्यात आले आहे. कपिल देव यांच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या रणवीरची पत्नी म्हणून ती चित्रपटामध्ये दिसणार आहे. सूत्रांच्या मते, दीपिकाला या चित्रपटामध्ये जास्त दाखवले जाणार नाही. फक्त पाहुणा कलाकार म्हणून ती दिसण्याची शक्यता आहे. तर पिंकव्हिलाने मात्र दीपिकाला चांगला रोल मिळाला असून ती कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांच्या भूमिकेत दिसेल असे म्हटले आहे.


View this post on Instagram

cuddles & snuggles! smashed in the middle!❤️ @ranveersingh @anishapadukone

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

सूत्रांच्या मते, चित्रपटामध्ये एक दृश्य असेही आहे की हिंदुस्थानच्या विकेट पडण्य़ास सुरुवात झाल्यानंतर ती मैदानाबाहेर निघून जाते आणि हिंदुस्थान सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये येतो तेव्हा ती परत येते. हा एक ड्रामासीन आहे. तसेच या चित्रपटामध्ये लव्ह स्टोरीही पाहता येणार आहे. सध्या दीपिका ‘छपाक’ या चित्रपटामध्ये अॅसिड हल्ला झालेल्या एका तरुणीची भूमिका साकारत आहे.