…आणि दीपिका नृत्य करताना पडली

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रत्येक कार्यक्रमासाठी सर्व अभिनेता व अभिनेत्री प्रचंड मेहनत घेत असतात. परंतु कधी कधी तोल न सावरला गेल्याने रॅम्पवॉक करताना किंवा नृत्य करताना पाय घसरल्याने अभिनेता किंवा अभिनेत्री स्टेजवर पडल्याच्या घटना काही नवीन नाही. असेच काहीसे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंह सोबत घडले. काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदरमधील एका शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन आपल्या नृत्यप्रशिक्षकासोबत नृत्य करताना अचानक पडली. विशेष नृत्य करताना पडल्यानंतर लगेचच आपला तोल सावरत पुढील नृत्य केले. या सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून त्याक्षणी दीपिकालाही हसू आवरले नाही. हा व्हिडीओ तिने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला असून त्याला तिने अनोखे कॅप्शनही दिले आहे.

दीपिका गेल्या काही वर्षापासून ओडिशी या नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण घेत असून ती दररोज नृत्यक्लासलाही जाते. अभिनेत्री दीपिका सिंह स्टार प्लस या टीव्ही चॅनलमधील दीया और बाती हम या लोकप्रिय मालिकेत संध्या राठीची भूमिका साकारली होती.