हरणाची शिकार करून मांस विकणारे दोघे भाऊ अटकेत

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

नारेगाव परिसरात हरणाची कत्तल करून मास विकणाऱ्या दोघांना एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या पथकाने सकाळी पकडले.

हरणाचे मांस विकणारे शेख असीफ शेख चाँद, शेख साजीद शेख चाँद या दोन भावांना अटक करण्यात आली आहे.