राहुल गांधी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘सारे मोदी चोर हैं’ या वक्तव्याविरोधात बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील मोदी यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे समाजातील मोदी नावाच्या व्यक्तींची प्रतिमा मलीन झाल्याचे सुशील मोदी यांनी म्हटले आहे. हे कृत्यच गुन्हेगारी स्वरूपाचे असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे असेही मोदी यांनी म्हटले आहे.