निवडणूक काळात कोटय़वधींची रोकड, मद्य व मादक पदार्थ जप्त

83
liquor Liqueur

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीची घोषणा 10 मार्च रोजी केल्यापासून निवडणुकीचा अखेरचा टप्पा पार पडेपर्यंत निवडणूक आयोगाने 3 हजार 449 कोटी 12 लाख रुपयांचा मुद्देमाल पकडला. यात काही रोकड, मादक पदार्थ, मद्य आणि किमती वस्तूंचा समावेश आहे. हा धडाका लावल्याची माहिती निवडणूक आयोगाने रविवारी दिली.

निवडणूक आयोगाचे डायरेक्टर जनरल दिलीप शर्मा पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी म्हणजे 2014 साली जप्त करण्यात आलेल्या वस्तूंपेक्षा या वस्तू तिप्पटीने जास्त आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2014मध्ये एकूण 1206 कोटींच्या आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या.

ते पुढे म्हणाले की, 10 मार्च आणि 19 मे या कालावधीत 839.03 कोटीची रोकड जप्त करण्यात आली, तर 294.41 कोटींचा मद्याचा साठा आणि 1270.37 कोटींचे मादक द्रव्य पकडले. त्याच कालावधीत सोने-चांदीचा 986.76 कोटींचा साठाही जप्त करण्यात आला, असे त्यांनी पुढे स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या