चोराच्या उलट्या बोंबा! ईडीने अडकवल्याचा मेहूल चोक्सीचा आरोप

12

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याने सोशल साईटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने त्याच्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे. तसेच ईडीने त्याला जाणीवपूर्वक या प्रकरणात अडकवले असून बेकायदेशीरपणे त्याची संपती जप्त केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानमध्ये प्रत्यार्पण करण्यास येणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे. देशातून पसार झाल्यानंतर चोक्सी पहिल्यांदाचा मीडियासमोर आला आहे.

ANI या वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. यात त्याने ईडीवरच खापर फोडले असून चुकीच्या आरोपाखाली आपल्याला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं त्यानं म्हटलं आहे. सध्या चोक्सीला हिंदुस्थानच्या स्वाधीन करावे अशी मागणी हिंदुस्थान सरकारने एंटीगुआ सरकारकडे केली आहे. तेव्हापासून चोक्सी अस्वस्थ झाल्याचे वृत्त आहे.
त्याचपार्श्वभूमीवर त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने कुठलेही ठोस कारण न देता विनाकारण माझा पासपोर्ट रद्द करण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच माझा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत प्रत्यार्पण करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं चोक्सीने म्हटलं आहे.

पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहूल चोक्सी हे मुख्य आरोपी आहेत. हे दोघे फरार आहेत. नीरवच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. तर चोक्सीच्या विरोधातही रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोक्सीला अनेकवेळा हिंदुस्थानच्या सरकारी यंत्रणेने समन बजावले आहे. पण प्रत्येकवेळी त्याने हिंदुस्थानमध्ये येण्यास असमर्थता दर्शवली होती. तसेच हिंदुस्थानमध्ये आल्यास माझ्याबरोबर मॉब लिचींग होईल असे त्याने म्हटले होते.

summary-ed trap me mehul choksi claim

आपली प्रतिक्रिया द्या