वडिलांच्या मदतीने मुलाने सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून केली हत्या

12


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नवी दिल्लीतील निहाल विहार भागात माणुसकीला काळिमा फासणारी भयानक घटना घडली आहे. येथे एका मुलाने सात वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केला. हे त्याच्या पित्याला कळताच त्याने त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी मुलीची हत्या करून पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर घरातल्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती. मुलीचा शोध घेत असताना रविवारी पोलिसांना एका नाल्याजवळ मुलींचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.

पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने त्यांना तत्काळ अटक करण्यात आली. यावेळी मुलाने मुलीला चिप्स देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले व तिच्यावर बलात्कार केल्याची कबुली दिली. तसेच त्याबद्दल वडिलांना समजताच त्यांनी अटक होण्याच्या भीतीने मुलाच्या मदतीने मुलीची हत्या केल्याचे व तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या