हिंदुस्थान बंदला हिंसक वळण, शाळेच्या बसवर दगडफेक

2
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
महागाई विरोधात काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी देशभरात सुरू केलेल्या हिंदुस्थान बंदला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. पुण्यात आंदोलकांनी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघालेल्या बसवर दगडफेक केली. तर बिहारमध्ये आंदोलकांनी पेट्रोल पंपाची तोडफोड केली आहे.
andheri-protest-1
मुंबईतही काही भागात बंद दरम्यान तोडफोड झाली. बेस्टच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. तसेच अंधेरी रेल्वे स्थानकात रेल रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिंडोशीत भाजप नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तर गुजरातमधील भरुचमध्ये रस्त्यावर गाडीचे टायर जाळण्यात आले. मध्यप्रदेशमधील उज्जैन शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका पेट्रॉल पंपला लक्ष्य करत तोडफोड केली. यावेळी एका पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. बिहारमधील दरभंगा येथे कमला फास्ट पॅसेंजरला अडवण्यात आले व रेल्वे मार्गावर जाळपोळ करण्यात आली.
दरम्यान, कैलास मानसरोवर यात्रेहून आलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. बंदमध्ये सहभागी होण्याआधी राहुल यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहीली. त्यानंतर ते या बंदमध्ये सहभागी झाले. राहुल यांच्याबरोबरच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे देखील रामलीला मैदानावर आंदोलनात सहभागी झाले. या हिंदुस्थान बंदमध्ये २१ पक्ष सहभागी झाले आहेत.
summary-delhi-hindustan-band-turn-violent