पाकड्यांचे पुन्हा क्रिकेट ‘खेळू द्या ना वं’, बीसीसीआयने फटकारले

15


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

गेल्या काही वर्षांपासून राजकीय तणावामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात खेळली जाणारी द्विपक्षीय मालिका बंद आहे. पण ही मालिका पुन्हा एकदा सुरू व्हावी यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयसमोर हिंदुस्थानबरोबर क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. पण जोपर्यंत दोन्ही देशातील राजकीय संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानबरोबर खेळणे शक्य नाही असे सांगत बीसीसीआयने पाकिस्तानला फटकारले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान यांनी नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले की आम्ही नेहमीच हिंदु्स्थानला खेळण्यासाठी विचारत असतो. पण त्यांच्याकडून काही उत्तर मिळत नाहीये. तसेच आम्ही खेळण्यासाठी आता हिंदुस्थानची वाट बघू शकत नाही. पण आमची इच्छा आहे की त्यांनीही याबद्दल विचार करावा.

वसीम खान यांच्या या वक्तव्यानंतर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट सामने खेळण्याआधी पाकिस्तान क्रिेकेट बोर्डाला सध्याच्या परिस्थितीचा विचार करायला हवा. कारण सध्या दोन्ही देशांमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. अशी प्रतिक्रीया व्यक्त करत बीसीसीआयने खान यांना गप्प केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या