श्रीलंका हादरवल्यानंतर इसिसचे दहशतवादी आता लक्षद्वीपमध्ये

49

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

इसिसचे संशयित 15 कुख्यात दहशतवादी नौकांमध्ये स्वार होऊन श्रीलंकेहून लक्षद्वीपसाठी रवाना झाल्याची गुप्त माहिती आल्यानंतर केरळ किनारपट्टीवर हाय ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस विभागाने केरळच्या समुद्रकिनाऱयांवरील पोलीसप्रमुखांना आणि पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमच्याकडे ऍलर्ट जारी होणे ही आम बाब असते. मात्र यावेळी दहशतवाद्यांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात आल्याने आम्ही जास्त काळजी घेत आहोत. समुद्रात नजरेच्या टप्प्यात कोणतीही संदिग्ध बोट दिसली तर आम्ही त्वरित किनाऱयांवरील पोलीस ठाण्यांना खबर करणार आहोत. दरम्यान, किनाऱयांवरील पोलीस ठाण्यातील अधिकाऱयांनी सांगितले की, 21 एप्रिल रोजी श्रीलंकेमधील आठ साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर आम्ही सतर्कच आहोत. मच्छीमार बोटींच्या मालकांना आणि समुद्रात नियमित जाणाऱयांनाही आम्ही संशयित स्थितीबाबत सूचित करण्यास बजावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या