जमीयत- उलमा-ए-हिंद कडून मुस्लीम तरुणांना स्वरक्षणाचे धडे

10


सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मुस्लीम तरुणांना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी जमीयत उलमा-ए-हिंद या संघटनेने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत संघटनेने जमीयत यूथ क्लबची स्थापना केली असून तिथे तरुणांना प्रतिकूल परिस्थितीत स्वत:बरोबरच इतरांचेही रक्षण कसे करावे याचे शिक्षण दिले जात आहे.

सध्या हिमाचल प्रदेश, हरयाणा, चंदीगढ येथील मुस्लीम तरुणांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. आतापर्यंत ७ हजार तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. गुजरात व उत्तर प्रदेशमध्येही असे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आल्याचे या प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी याहया करीमी यांनी सांगितले आहे. दरम्यान यासाठी स्काऊट व गाईडचीही मदत घेण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या